मुंबई, 7 डिसेंबर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार षंढ आणि नामर्द असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे सरकारमधले मंत्री शंभुराज देसाई चांगलेच आक्रमक झाले. 'संजय राऊत आपलं तोंड आवरा. साडेतीन महिने आराम करून आलात, परत अशी वेळ येऊ देऊ नका,' असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला.
शंभुराज देसाई यांच्या या इशाऱ्यावर आता संजय राऊत यांनी पुन्हा पलटवार केला आहे. 'मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत.सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही.कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
'महाराष्ट्राचं सरकार कुणाच्याही नावाने चालू द्या. महाराष्ट्राच्या अस्मितेचं, जमिनीचं रक्षण करणं जमलं नाही, त्या सरकारने एकही दिवस राहणं गरजेचं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं, डरपोक सरकार आहे. जनतेची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जात आहेत. हे नामर्द सरकार आहे. तुमच्यासारखा नामर्द मुख्यमंत्री झाला नाही. हे डरपोक आहेत. काय कराल तुरुंगात टाकाल? आम्ही घाबरत नाही. घाबरलेल्या मंत्र्यांना आम्ही सुरक्षा देऊन नेतो. बेळगावला केंद्रशासीत करा,' असं संजय राऊत म्हणाले होते.
Is ths an open threat,Mr Minister? While State govt is mum on the issue of our Pride,those raising voice for Maharashtra r seen as enemies It's evident tht Law & Judiciary is undr pressure Bt ppl wil not sit n watch It's clear now,those speakng the Truth wil b sent to jail! pic.twitter.com/ZmQEKDBNiB
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
राज्यातील सीमा कुरतडल्या जात आहेत?, गाव विकासापासून वंचित राहिल्यासारखं का वाटतंय?
शंभुराज देसाईंचं प्रत्युत्तर
'आम्हाला राऊत षंढ बोलत आहेत, पण ते स्वत: कर्नाटकात केससाठी गेले नाहीत. संजय राऊत आपलं तोंड आवरा साडेतीन महिने आराम करून आलात, परत अशी वेळ येऊ देऊ नका. पवार यांच्या नेतृत्वात जात आहात, मग राऊत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नाही का?,' असा सवाल शंभुराज देसाई यांनी विचारला.
'एकनाथ शिंदे 40 दिवस कर्नाटक जेलमध्ये राहिले होते. राऊतांना शिंदेंवर बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी तोंड आवरलं नाही तर जशास तसं उत्तर मिळेल. एकनाथ शिंदेंबाबत परत बोललात तर शांत बसणार नाही. वेळ आली तर दोन हात करू,' असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला.
'महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये, म्हणून आम्ही कर्नाटकात गेलो नाही. आम्ही लवकरच दौरा करणार आहोत. 48 तासांमध्ये परिस्थिती निवळेल हे शरद पवारांना माहिती आहे, त्यांना तिकडे जावं लागणार नाही,' अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.
CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट! पण, शेवटच्या वाक्यात सीमावादावर मोठं भाष्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut