इराण-अमेरिकेच्या तणावाचा औरंगाबादच्या शेतकऱ्यांना बसला फटका, हे आहे कारण...

इराण-अमेरिकेच्या तणावाचा औरंगाबादच्या शेतकऱ्यांना बसला फटका, हे आहे कारण...

खरंतर दुष्काळामुळं इथला शेतकरी अडचणीत आला होता. मात्र, कारल्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला पण...

  • Share this:

औरंगाबाद, 08 जानेवारी : इराण आणि अमेरिकेदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र, त्याची झळ औरंगाबादेतील वरूड काजी या गावातील शेतकऱ्यांना बसली आहे. कारण, या गावातून होणार कारल्याची निर्यात थांबली आहे.

एका छोट्याश्या गावचे कारले चक्क अमेरिकेत एक्सपोर्ट होत आहेत. यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे औरंगाबाद-जालना रोडवर असलेल्या वरूड काजी या गावाने हे सिद्ध केलं आहे. गावातून जवळपास दररोज दीड ते दोन टन कारले अमेरिकेसह इतर राज्यात पाठवले जाते.

गावाच्या जवळपास 80 ते 100 एकरवर कारल्याच्या बागा शेतक-यांनी लावल्या आहेत. मध्यतरी जो पाऊस झाला त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनाकडे वळले.

जिल्ह्यातील वरूड काजी य़ा गावानं जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. अमेरिकेतील नागरिकांना इथल्या  कारल्याची गोडी लागली. त्यामुळेच इथून रोज अडीच टन ते तीन टन कारल्याची अमेरिकेत निर्णयात केली जातेय. मात्र, इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावाचा फटका इथल्या कारले उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

या गावात जवळपास 80 ते 100 एकरवर कारल्याची लागवड केली जाते. गेल्या काही वर्षात कारल्याचं गाव म्हणून वरुड काजीनं ओळख निर्माण केली. निर्यातीमुळं शेतकऱ्यांना दरही चांगला मिळत आहे.

शेतकरी अप्पासाहेब किसन मुळे सांगतात, 1 एकरात कारले लावले. यासाठी 25-30 हजार खर्च आला. आता हीच कारली अमेरिकेत जातात. एक्स्प्रोचा दर 35 रुपये किलो तर लोकल 18 रुपये आहे. त्यामुळे एका एकरात 2 ते 2.50 लाख उत्पन्न मिळते.

खरंतर दुष्काळामुळं इथला शेतकरी अडचणीत आला होता. मात्र, कारल्याच्या उत्पादनातून  शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे.  आता अमेरिका आणि इराणमधील तणावामुळं त्यांची चिंता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: USA
First Published: Jan 8, 2020 11:46 PM IST

ताज्या बातम्या