विश्वास नांगरे पाटील पुन्हा चर्चेत, IPS होण्याचं स्वप्न पाहिलेल्या कॅन्सरग्रस्ताला दिली स्वत:ची कॅप

विश्वास नांगरे पाटील पुन्हा चर्चेत, IPS होण्याचं स्वप्न पाहिलेल्या कॅन्सरग्रस्ताला दिली स्वत:ची कॅप

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं तरुणांना मोठं आकर्षण आहे. याबाबतचे किस्से अनेकदा समोर आले आहेत.

  • Share this:

नाशिक, 30 जून : वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं तरुणांना मोठं आकर्षण आहे. याबाबतचे किस्से अनेकदा समोर आले आहेत. आता एका कॅन्सरग्रस्ताने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे पुन्हा याचा प्रत्यय आल्याचं पाहायला मिळालं.

सागरे बोरसे या तरुणानं आयपीएस होण्याचं स्वप्न पाहिलं. पण कॅन्सरच्या आजारानं त्याचा घात केला. सध्या सागरवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करण्याआधी सागरने एक इच्छा व्यक्त केली, जी तिथल्या डॉक्टर्सने क्षणाचाही विलंब न लावता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. सागरची इच्छा होती ज्या व्यक्तीकडे पाहून त्याने आयपीएस होण्याचं स्वप्न पाहिल्या त्या विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची.

रुग्णालयातील डॉक्टर्सने ताबडतोब हालचाली करत सागरची इच्छा नांगरे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर नांगरे पाटील यांनीही आपल्या कामातून वेळ काढत सागरला भेटायचं ठरवलं.

काही वेळानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी सागरला भेट तर दिलीच पण त्याच्या डोक्यावर आपली कॅपही ठेवली. तसंच त्यांनी सागरला त्याच्या भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढत असलेल्या सागरला आकाश ठेंगणं झालं आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही विश्वास नांगरे पाटील चर्चेत आले होते. तीन वर्षांआधी कौटुंबिक कलहातून घर सोडलेल्या एका 61 वर्षीय माऊलीची आणि तिच्या दोन लेकरांची नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भेट घडवून आणली होती. ''माझा एक मुलगा पीएसआय आहे, तर दुसरा कंडक्टर,'' असं सांगणारा प्रमिला पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading