महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट, देवेन भारती नवे एटीएस प्रमुख

महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट, देवेन भारती नवे एटीएस प्रमुख

महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. देवेन भारती यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे एटीएस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे-महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी हे आदेश जारी केले आहेत. देवेन भारती यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे एटीएस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी IPS अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. त्यात 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पत्रकार जे.डे.हत्याकांडचा समावेश आहे.

देवेन भारती यांनी दहशतवादी संघटना 'इंडियन मुजाहिदीन'चे कंबर तोडण्यात सक्रिय भूमिका पार पाडली. निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन काही दिवसांपूर्वी देवेन भारती यांची ज्वॉइंट कमिश्नर इकोनामिक ऑफेंस पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याआधी त्यांनी ज्वॉइंट कमिश्नर लॉ अॅण्ड ऑर्डरचे नेतृत्त्व केले होते.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमातीपस कलम 22 (न) च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वमान्यतेने भारतीय पोलीस सेवेतील अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदली करण्यात आली आहे. यात देवेन भारती, अतुल कुलकर्णी, प्रताप दिघावकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती..

मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) आशुतोष के डुंबरे यांना अप्पर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (मुंबई), फोर्स वनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुखविंदर सिंग यांची फोर्स वनच्या अप्पर पोलीस महासंचालक (मुंबई),  विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांना  अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण  कंपनी मर्यादीत (मुंबई), विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रतिक्षाधीन)  विनित अगरवाल यांना अप्पर पोलीस महासंचालक,  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (मुंबई) यापदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (मुंबई) सुनील रामानंद यांना अपर पोलीस महासंचालक, सुधार सेवा, (पुणे), पोलीस उप महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष, महाराष्ट्र राज्य, (मुंबई) प्रताप आर. दिघावकर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध, महाराष्ट्र राज्य, (मुंबई), पोलीस उपमहानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (मुंबई) मनोज एस. लोहिया यांना विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (मुंबई), पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, (पुणे) दत्तात्रय यादव मंडलिक यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अभिलेख कक्ष, (पुणे), अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, (ठाणे शहर) केशव जी. पाटील यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण संचलनालय, (मुंबई), अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,( पुणे शहर) पी. व्ही. देशपांडे यांना संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्त प्रबोधिनी, (पुणे), येथे पदोन्नती देण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची झाली बदली...

अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, (मुंबई) डॉ. प्रज्ञा सरवदे यांची अपर पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, (मुंबई), अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई अतुलचंद्र कुलकर्णी यांची अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, (पुणे), अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, (पुणे) संजीव के. सिंघल यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, (मुंबई), विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, (मुंबई) कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन, (मुंबई), सह पोलीस आयुक्त, प्रशासन, (मुंबई) संतोष रस्तोगी यांची सह पोलीस आयुक्त, गुन्हे, (मुंबई), विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, (मुंबई) राजवर्धन यांची सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, (मुंबई), सहपोलीस आयुक्त, वाहतूक, (मुंबई) अमितेश कुमार यांची सहआयुक्त, गुप्तवार्ता, राज्य गुप्तवार्ता विभाग, (मुंबई), विशेष पोलीस महानिरीक्षक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ,(मुंबई) दीपक पाण्डेय यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, (मुंबई) येथे बदली झाली आहे.

VIDEO:अहमदनगरच्या तरुणाचा दिल्लीतील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत राडा

First published: May 15, 2019, 9:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading