शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष देण्यासाठी बोलवा, दुसरा अर्ज दाखल

शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष देण्यासाठी बोलवा, दुसरा अर्ज दाखल

शरद पवार यांना आयोगाकडून साक्ष देण्यासाठी बोलावण्यात येणार का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भीमा कोरेगाव प्रकरणात साक्ष देण्यासाठी बोलवावं, असा अर्ज 'विवेक विचार मंच'चे सदस्य सागर शिंदे यांचे वकील प्रदीप गावडे यांनी केला आहे. त्यांचा हा दुसरा अतिरिक्त अर्ज आहे. त्यामुळे शरद पवार यांना आयोगाकडून साक्ष देण्यासाठी बोलावण्यात येणार का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

'भीमा कोरेगाव हा एक वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमासाठी लोक कोरेगावात येतात. विजय स्तंभाला अभिवादन करतात. भीमा कोरेगावला येणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. पण यामध्ये 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संभाजी भिडे आणि हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांच्याकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलं,' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला होता.

शरद पवार यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचं नाव घेऊन घणाघाती आरोप केल्याने त्यांच्याकडे या प्रकरणात अतिरिक्त माहिती असल्याचे सांगत 'विवेक विचार मंच'चे सदस्य सागर शिंदे यांचे वकील प्रदीप गावडे यांनी शरद पवार यांनाच साक्ष देण्यासाठी बोलवावं, यासाठी अर्ज केला.

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार भिडे-एकबोटेंविरोधात आक्रमक

'सध्या भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध जोडला जात आहे. पण एल्गार परिषद ही वेगळी आहे. एल्गार परिषद ही भीमा कोरेगावच्या काही दिवसांआधी झाली होती. 100 पेक्षा जास्त संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षपद नि. न्यायमूर्ती पी बी सावंत करणार होते. परंतु प्रकृती खालावल्याने ते येऊ शकले नाहीत.

'यावेळी हजर नसलेल्या लोकांवरही खटले दाखल करण्यात आले. जे लोक नव्हते त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. यावेळी आधी वातावरण निर्मिती केली गेली होती. सुधीर ढवळेंनी कविता वाचली म्हणून त्यांना अटक केली गेली. ही कविता नामदेव ढसाळांची होती. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय-बहीण आजही विटंबली जाते’ही ती कविता होती. कुसुमाग्रजांच्याही कविता आक्रमक असतात' असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

First published: February 24, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading