चाकण, 21 जून : पुणे जिल्ह्यातील चाकणच्या जलतज्ञ योगशिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नाकाने पाणी पिणे अर्थात "नाक तंदुरुस्ती, कोरोना से मुक्ती" यावर आसन करून प्रबोधन केले आहे.
योगामध्ये शरीर शुद्धीच्या अनेक क्रिया आहेत. त्यामध्ये मानसिक शुद्धीबरोबरच शारीरिक शुद्धीक्रियाही अंतर्भूत आहेत. सध्या दूषित वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग करून स्वतःला रोगमुक्त ठेवणे गरजेचे आहे. शुद्धीक्रियांमध्ये प्राणायाम, नेती, धौती, बस्ती ,कपालभाती यांचा समावेश होतो.
सध्याच्या परिस्थितीत वेळोवेळी श्वसनमार्ग शुद्ध होणे फार गरजेचे आहे. अशा वेळी नेती ही शुद्धीक्रिया उपयोगी पडते. नेतीमध्ये जलनेती आणि सूत्रनेती केली जाते.
आपण आपल्या नाकातील मागील भाग कधीच स्वछ करत नाही. त्यामुळे वारंवार सर्दी पडसे,खोकला डोकेदुखी किंवा नाकाचे इतर त्रास होतात. जलनेतीने हे त्रास दूर होतात. नेतीपात्रात कोमट पाणी घेऊन त्यात थोडे मीठ टाकून ते पाणी एका नाकपुडीत सोडून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढले जाते. थोड्याशा सरावाने हे सर्वांना शक्य आहे.
यापुढील क्रिया म्हणजे नासापान अर्थात नाकाने पाणी पिणे ही नेतीच्या पुढील प्रगत क्रिया आहे. यासाठी मात्र पुरेसा सराव आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.