बाबा रामदेव देणार मुख्यमंत्र्यांना 'योगा'चे धडे

बाबा रामदेव देणार मुख्यमंत्र्यांना 'योगा'चे धडे

केंद्रातले सर्व मंत्रीही देशातल्या विविध भागात होणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडची राजधानी रांचीमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

  • Share this:

मुंबई 19 जून :  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  21 जून रोजी नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबा रामदेव उपस्थित राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी दिलीय. बाबा रामदेव यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषीत केलाय. जगभरातील अनेक  देश हा दिवस उत्साहाने साजरा करतात.

स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजलीचे सहकार्य मिळणार असून दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील 36 जिल्हा मुख्यालय आणि 322 तालुका मुख्यालय अशा 358 ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचही शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दुर राहू असं बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. बाबा रामदेव यांनी योग करण्याचं महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिकही पत्रकार परिषदेत करुन दाखविली.

केंद्रातले सर्व मंत्रीही देशातल्या विविध भागात होणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडची राजधानी रांचीमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जगभरातल्या भारतीय दुतावासांनीही योग दिना निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय.

First published: June 19, 2019, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading