इंटरनॅशनल कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीकडून 40 लाखांसह सोन्याचे बिस्किटं जप्त

इंटरनॅशनल कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीकडून 40 लाखांसह सोन्याचे बिस्किटं जप्त

अटक केलेल्या व्यक्तीकडून 40 लाख रुपयांची रोकड आणि 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किटं पोलिसांनी जप्त केली आहेत.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर: मुंबई क्राईम ब्रॅंचनं बोगस इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. रॅकेट चालवणाऱ्या एका 30 वर्षीय आरोपीला मुंबईतील मालाड (पश्चिम) येथून अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 40 लाख रुपयांची रोकड आणि 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किटं पोलिसांनी जप्त केली आहेत.

हेही वाचा....शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर...आदित्यंवर अत्यंत खोचक टीका

मिळालेली माहिती अशी की, मुंबई क्राईमनं गोपनीय माहितीच्या आधारे 29 ऑगस्टला ही मोठी कारवाई केली होती. माहिती मिळताच पोलिसांनी मालाड ( पश्चिम ) येथून आरोपीला अटक केली होती. आरोपीकडून गांजा, गांजा भरलेले सिगारेट्स

आणि एक संशयित चोरीची यमाहा दूचाकी पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणी बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालवत होता इंटरनॅशनल कॉल सेंटर...

तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी हा बोगस इंटरनॅशनल कॉल सेंटरचं रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे.  तोच त्याच्या इतर साथीदारासोबत भारतातील विविध शहरांमधून घरांमधूनच मोबाइल फोनद्वारे बोगस कॉल सेंटर चालवून युएसए आणि कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करुन त्यांची कोटयावधी डॉलर्सची फसवणूक करत होता.

स्कॅमचा एक भाग म्हणून या रॅकेटमधील व्यक्‍ती, अमेरिका आणि कॅनडा स्थित नागरिकांना टार्गेट करत होता. कॉल सेंटरद्वारे स्वत:ला इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस किंवा यु.एस. सिटीझनशिप किंवा इमिग्रेशन सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचं सांगून त्यांचीफसवणूक केली जात होती. त्याचबरोबर डाटा ब्रोकर आणि इतर स्त्रोतेकडून मिळालेल्या माहितीचा वापर करुन, या गुन्हेगारांनी अमेरिका आणि कॅनडा स्थित लोकांना सरकारकडे थकबाकी रक्‍कम न भरल्यास अटक, तुरुंगवास, दंड किंवा हद्दपारीची भिती घालून लक्ष्य केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा...मोठा निर्णय! दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाहीच!

गुन्हेगारांच्या फसवणुकीला जे असे बळी पडले आणि पैसे भरण्यास राजी झाले, त्यांना स्टेअर्ड व्हॅल्यू कार्ड खरेदी करुन किंवा वायर मनीद्वारे इत्यादी प्रकारे पेमेंट करण्याबाबत सूचना दिल्या जातात. आरोपीच्या पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडून अशा गुन्ह्याद्वारे प्रात केलेल्या 40 लाख रुपये रोख रक्‍कम आणि 200 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे त्याच्या एक्सिस बँक, मालाड पश्‍चिम शाखेतील लॉकरमधून जप्त करण्यात आले आहे. आरोपीला कोर्टात हजर केलं असता 4 सप्टेंबरपर्यंत क्राईम ब्रँच कस्टडी ठोठावण्यात आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या