भाजपमधील अंतर्गत कलह उफाळला, सभापतींची कारकीर्द संपताच केले गंभीर आरोप

भाजपमधील अंतर्गत कलह उफाळला, सभापतींची कारकीर्द संपताच केले गंभीर आरोप

नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चांगलाच उफाळून आला आहे. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी आपली कारकीर्द संपताना काही पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप केले.

  • Share this:

नाशिक,29 फेब्रुवारी:नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चांगलाच उफाळून आला आहे. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी आपली कारकीर्द संपताना काही पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला, अवास्तव मागण्या केल्या, असा गंभीर आरोप उद्धव निमसे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना तातडीने बदलावे, अशी मागणी निमसे यांनी केली आहे.

हेही वाचा..मोठी बातमी, मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा

स्थायी समितीची अखेरची बैठक उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. त्यावेळी उद्धव निमसे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत देखील भाजपच्या काही सदस्य गैरहजर होते. त्यांनी अर्थ संकल्पाला मंजुरी देऊ नये, असे आदेश काही पक्ष नेत्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी बैठकीस येऊ नये यासाठी त्यांना सहलीला नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजप हा केडर बेस पक्ष आहे. मात्र, काही लोकांमुळे पक्षाची प्रतिमा डागळात आहे, असे निमसे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा..शासकीय कार्यालयातील लॅपटॉप आणि संगणक चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे उद्धव निमसे यांनी सांगितले. काही नेत्यांच्या हटवादी पणामुळे राज्यातील सत्ता गेली, अशी स्थिती पुन्हा होऊ नये. यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, असे सांगताना त्यांनी आपण पक्ष सोडून जाणार नाही. उलट पक्षात राहून संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 29, 2020 03:21 PM IST

ताज्या बातम्या