Home /News /maharashtra /

...तर व्याज आणि विलंब शुल्क माफ, नितीन राऊत यांनी वीजग्राहकांसाठी मोठी घोषणा

...तर व्याज आणि विलंब शुल्क माफ, नितीन राऊत यांनी वीजग्राहकांसाठी मोठी घोषणा

जागतिक पर्यटन केंद्र लोणार इथं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा केली

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 01 मार्च : कोरोनाच्या काळात आलेले भरमसाठ बिल (electricity bill) अजूनही लोक फेडत आहे. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नवीन घोषणा केली आहे. जर, 'एक-रक्कमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जातील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. कोरोनाच्या काळात मिटर बंद असल्यामुळे एकाच वेळी वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही ठिकाणी वीज मिटर नसतानाही बिलं आली होती. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर चहुबाजूने टीका होत होती. अजूनही काही ठिकाणी वीज ग्राहक आपली वीज कनेक्शन कट होऊ नये म्हणून टप्याटप्याने वीज बिल भरत आहे. आज जागतिक पर्यटन केंद्र लोणार इथं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. (LIC च्या योजनांमध्ये मिळेल 10-12% जास्त पेन्शन, तुमच्यासाठी कोणती योजना फायदेशीर) 'जर वीज ग्राहकांनी एक-रक्कमी थकबाकी भरले तर सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती नितीन राऊत  यांनी दिली. (Online Fraud मध्ये पैसे कट झाले? या पद्धतीने मिळू शकतात परत) 'सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. त्याचबरोबर लघुदाब वीज ग्राहकांनी एक रक्कमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे, अशी घोषणाही राऊत यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या