आंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचायतीने केलं होतं बहिष्कृत; तब्बल 20 वर्षांनी सन्मानाने घेतलं परत

आंतरजातीय विवाह केला म्हणून जातपंचायतीने केलं होतं बहिष्कृत;  तब्बल 20 वर्षांनी सन्मानाने घेतलं परत

कायद्यात ही तरतूद असल्याने न्यायालयाच्या मदतीने हा समेट घडवायला मान्यता दिल्यानंतर या कुटुंबासोबत इतर आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत असलेल्या 78 कुटुंबांना ही समाजात सदस्य म्हणून सन्मानाने सदस्यत्व देत असल्याच मान्य केले.

  • Share this:

पुणे, 11 एप्रिल- दोन वर्षांपूर्वी जातीतून बहिष्कृत केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी जातपंचायतीच्याच पुढाकाराने बहिष्कृत कुटुंबाला पुन्हा जातीमध्ये घेण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे या निर्णयावर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलंय.

काय आहे प्रकरण?

अजित रामचंद्र चिंनचने यांना 20 वर्षांपासून आंतरजातीय विवाह केला म्हणून तेलगू मडेलवर परीट समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कृत केलं होतं.अंनिसच्या मध्यस्थीने अनेक प्रयत्न करुनही जातपंचायतीने त्यांना सदस्य करुन घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर या प्रकरणात 9 पंचांच्या विरोधात सामाजिक बहिष्कृत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पंचांची पाचावर धारण बसली. त्यानंतर हे पंच बहिष्कृत कुटुंबासोबत समेट करण्याची मागणी करत होते. कायद्यात ही तरतूद असल्याने न्यायालयाच्या मदतीने हा समेट घडवायला मान्यता दिल्यानंतर या कुटुंबासोबत इतर आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत असलेल्या 78 कुटुंबांना ही समाजात सदस्य म्हणून सन्मानाने सदस्यत्व देत असल्याच मान्य  केले. तसेच आंतरजातीय विवाहांना ही प्रोत्साहन देत असल्याचे शपथपत्र न्यायालयात दिलंय आणि समेट घडवून आणलाय.

अजून 30 खटले प्रलंबित

सामाजिक बहिष्कृत कायद्यांतर्गत महाराष्ट्रात आणखी 30 गुन्हे दाखल आहेत.  त्यापैकी पहिल्या खटल्याचा आलाय. त्यात समेट करण्याचा हा निकाल देण्यात आलाय त्यामुळे याच मार्गाने इतर जातपंचायतींनाही या पंचांकडून आवाहन करण्यात आलंय. अंनिसने सातत्याने पाठपुरावा केल्यानेच  हे यश आल्याचे अजित रामचंद्र चिंनचने यांनी सांगितले.

जनाबाई तारु यांचे जटनिर्मूलन

दुसरीकडे, पुण्यातल्या भोर जिल्ह्यातल्या असलेल्या जनाबाई तारु यांचे अंनिसच्या वतीने जटनिर्मूलन करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातल्या तब्बल 100 महिलाचं जटनिर्मूलन पूर्ण झालंय. जनाबाई तारु यांच्या डोक्यात सुमारे 3 वर्षांपासून जट होती. मात्र कुटुंबात काही वाईट गोष्टी घडत अशी अंधश्रद्धेची भीती घालून त्यांना जटनिर्मूलन करु दिलं जात नव्हतं. एक महिन्यांपूर्वी जनाबाई यांचे पतीचे आजारापणाने निधन झाले. या अंधश्रद्धेतील फोलपणा त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी स्वतः अंनिसच्या नंदिनी जाधव यांना संपर्क करुन जट निर्मूलन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी तात्काळ जनाबाई यांच जट काढून टाकत एकट्या पुणे जिल्ह्यात 100 महिलांची जट निर्मूलन करण्याचा विक्रम केलाय.

VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत

First published: April 10, 2019, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading