मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Monsoon Preparations: पावसाळ्यापूर्वीच दक्षता घ्या अन्यथा... विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Monsoon Preparations: पावसाळ्यापूर्वीच दक्षता घ्या अन्यथा... विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पावसाळ्यात जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar)  यांनी सूचना केल्या. (mansoon)

पावसाळ्यात जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar) यांनी सूचना केल्या. (mansoon)

पावसाळ्यात जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar) यांनी सूचना केल्या. (mansoon)

पुढे वाचा ...
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 10 मे : 2019 आणि 2021 या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह राज्याला पावसाचा मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकऱ्यांसह (Farmer) सर्वच जण यामध्ये भरडून गेले होते. यासाठी प्रशासकीय यंत्रणा आतापासूनच सतर्क झाली आहे. मान्सून (Monsoon) काळात उद्भवणाऱ्या  नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar)  यांनी आज केली.

पावसाळ्याच्या काळात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला (Natural disasters) तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून केंद्रेकर म्हणाले की, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. याशिवाय महानगर पालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभागाने अधिक दक्ष राहावे. पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : Asani Cyclone : चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता, IMD कडून Alert जारी

नद्यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे/मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र/गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तात्काळ काढण्यात यावीत.

हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी. महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाईपलाईन दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिग ताबडतोब काढावेत.

वीज पडून मनुष्य हानी होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. सर्व गावांमध्ये पोहोचणारे रस्ते किंवा पर्यायी रस्ते ज्यामध्ये पुल, रेल्वे क्रॉसिंग इत्यादी अंतर्भूत आहे त्याची स्थिती तपासून घ्यावी.  महावितरणने लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपी, ट्रान्सफॉर्मर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

First published:

Tags: Monsoon, Pune rain, Rain, Rain flood

पुढील बातम्या