खडसे आणि तावडेंचा पत्ता कट, भाजपचा असा आहे 'नवा प्लान'!

खडसे आणि तावडेंचा पत्ता कट, भाजपचा असा आहे 'नवा प्लान'!

आपल्याला तिकीट मिळणार नाही हे समजल्याने खडसेंनी गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 03 ऑक्टोंबर : उमेदवारी अर्ज भरण्यास आता फक्त 1 दिवस शिल्लक राहिलाय. 4 ऑक्टोंबर हा शेवटचा दिवस आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,  मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता यांना पक्षाने तिकीट नाकारल्यातच जमा असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला असून खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. तर बावनकुळेंना काटोलमधून आशिष देशमुख विरोधात रिंगणात उतरविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर विनोद तावडे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. तर प्रकाश मेहेतांना त्यांच्यावरचे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप भोवले आहेत.

उदयनराजेंपेक्षाही अबू आझमी श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकीत!

तिसऱ्या यादीतही नावे नाहीत

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरूवारी आपल्या उमेदवारांची तिसरी जाहीर केली. मात्र, तिसऱ्या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची नावे न नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या चार जणांचा समावेश...

भाजपच्या तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे यांचा यादीमध्ये समावेश नाही. शिरपूरमधून काशिराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीमधून परिणय फुके आणि मालाड (पश्चिम) रमेश ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यत भाजपने 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेनेच्या युवराजांना आघाडीचा 'हा' नेता देणार टक्कर

खडसेंचा पत्ता कट..

भाजपच्या तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे आता निश्चित समजले जात आहे. आपल्याला तिकीट मिळणार नाही हे समजल्याने खडसेंनी गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हादरा, संजय निरुपम यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

भाजपकडून अद्यापही उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. आमदार संजय सावकारे सुद्धा यावेळी गहिवरले. खडसे म्हणाले, मी शरद पवारांच्या संपर्कात नाही. गेल्या तीन वर्षात शरद पवारांशी माझी भेट झालेली नाही. केवळ अफवा सोडण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितले. खडसे यांच्या बंगल्याबाहेर काही कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा इशाराही दिला असून एकनाथ खडसे यांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे कार्यकर्ते शांत झाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 3, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या