Home /News /maharashtra /

INSIDE STORY: ...आणि मंत्रिमंडळ बैठकीत 2 मोठे निर्णय होता होता राहिले

INSIDE STORY: ...आणि मंत्रिमंडळ बैठकीत 2 मोठे निर्णय होता होता राहिले

वाहतुकीवर ताण येणार असल्याने हा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका या मंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे.

    मुंबई, 17 जानेवारी : मुंबईतील लोकल, बस आणि मेट्रो वाहतूक बंद करण्यास मुंबईतील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आज विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सेवा बंद न करण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. या सेवा बंद झाल्यास सर्वसामान्यांच्या वाहतुकीवर ताण येणार असल्याने हा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका या मंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे. वाहतूक सेवा बंद केल्या तर ओला, उबर सेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील, अशीही भीती काही मंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद झाल्यास त्यानंतर सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण येईल, असा मुद्दा काही अधिकाऱ्यांनी मांडल्याचं समजतं. त्यामुळे पुढील 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात येणार नाहीत, यावरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे? 'आतापर्यंत राज्यात 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाग्रस्तांमध्ये 26 पुरूष 16 महिलांचा समावेश आहे. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. गर्दी कमी नाही झाली तर लोकल बंद करावी लागणार,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हेही वाचा- Coronavirus चीनचा धक्कादायक आरोप! 'अमेरिकेने वुहानमध्ये विषाणू पेरला' दरम्यान, राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. राज्यात पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र सध्यातरी सरकारने हा निर्णय घेण्याचं टाळलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Uddhav thackeray

    पुढील बातम्या