मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साताऱ्यात वाद पेटणार, उदयनराजेंनी उद्घाटनाला केलेल्या गर्दीची होणार चौकशी!

साताऱ्यात वाद पेटणार, उदयनराजेंनी उद्घाटनाला केलेल्या गर्दीची होणार चौकशी!


शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी शहरातील ग्रेड सेपरेटच्या भुयारी मार्गाची पाहणी केली होती.

शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी शहरातील ग्रेड सेपरेटच्या भुयारी मार्गाची पाहणी केली होती.

शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी शहरातील ग्रेड सेपरेटच्या भुयारी मार्गाची पाहणी केली होती.

सातारा, 09 जानेवारी :  साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर वर लावण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाम फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसंच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी जमवलेल्या गर्दीची चौकशी करणार असल्याचेही सांगितले आहे.

शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी शहरातील ग्रेड सेपरेटच्या भुयारी मार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज फलकाचे उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर लावण्यात आले होते. पण आज सकाळी अज्ञात समाजकंटकांकडून हे बॅनर फाडले असल्याचे समोर आले. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण पसरले होते.

भंडारा 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणावरून फडणवीसांचा गंभीर आरोप

त्यानंतर घटना स्थळावर उदयनराजे समर्थक आणि शिवप्रेमी दाखल होताच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. 'जे कोणी हे कृत्य केले आहे त्याचा शोध पोलीस घेतील आणि कडक कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

त्याचबरोबर उदयनराजे यांनी केलेलं ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन सोशल मीडियामध्ये पाहिल्यानंतर समजले असून जर का विना परवानगी गर्दी आणि नियमांचे पालन झाले नसल्यास या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

'माझ्या लेकीला तरी पाहू द्यायचे हो', काळजाचे पाणी करणाऱ्या आईचा आक्रोश

सातारा शहरात ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. गेल्या 3 वर्षांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते. 66 कोटी रुपये खर्चून हा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी मदत मिळणार आहे.

First published: