मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डॉक्टर की बाऊन्सर? आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण, भंडाऱ्यातला LIVE VIDEO

डॉक्टर की बाऊन्सर? आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण, भंडाऱ्यातला LIVE VIDEO

भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखान्यात ही घटना घडली आहे.

भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखान्यात ही घटना घडली आहे.

भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखान्यात ही घटना घडली आहे.

  • Published by:  sachin Salve
नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 24 मार्च : रुग्णांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टराने (doctor) आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील चपराश्याला (hospital worker) गळा आवळून लाथा-काठीने अमानुष मारहाण केल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखाण्याची घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखान्यात ही घटना घडली आहे. डॉ. कडस्कार असं  मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. तर नारायण उइके असं मारहाण झालेल्या चपराश्याचे नाव आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातच डॉक्टर कडस्कार याने बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे संपुर्ण प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या चपराश्याला मारहाण का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तरी ज्या प्रकारे डॉक्टराने आपल्या कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करत आहे. ते बघता या मारहाण करणाऱ्या डॉक्टरला जीवन देणारा देव मानावं की  शैतान म्हणावं असा प्रश्न भंडारावासियांना पडला आहे. (World Tuberculosis Day: फुफ्फुसांवर परिणाम करणाऱ्या टीबीची लक्षणं वेळीच ओळखा) आता या घटनेच्या व्हिडीओ वायरल झाला असून एका एमबीबीएस डॉक्टरने अशाप्रकारे मारहाण करणे डॉक्टरी पेशाला अशोभनीय आहे. या व्हिडीओबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
First published:

पुढील बातम्या