पंढरपूर, 05 नोव्हेंबर : देशभरात महागाईमुळे सर्वसामन्य जनता त्रस्त आहे. पण 'इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात अजूनही महागाई कमी आहे' असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.
डॉक्टर भागवत कराड आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते यावेळी भागवत कराड यांचा पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी असल्याचे मान्य केले.
इतर देशाच्या तुलनेत भारतात महागाई कमी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचं वक्तव्य pic.twitter.com/zQsu4jr5VK
— News18Lokmat (@News18lokmat) November 5, 2022
आपल्याकडे महागाईचा दर जास्त आहे,पण अमेरिका, चीनमध्ये जितकी महागाई आहे, त्या तुलनेमध्ये आपल्याकडे महागाई ही कमी आहे, असं वक्तव्य ही कराड यांनी केलं.
('..अन् फडणवीसांचाच करेक्ट कार्यक्रम झाला'; नाना पटोलेंचा पलटवार)
' चलनी नोटांवर गणपतीचे चित्र छापा हे गुजरात निवडणुकसाठी केजरीवाल यांची नौटंकी सुरू आहे. चलनी नोटांवर कोणत्याही दैवतांची चित्रे छापली जाणार नसल्याचेही अर्थ राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ज्या इंग्लंडने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्लंडमध्ये महागाईचा उच्चांक आहे. काही विकसनशील देशांपेक्षा भारतात मात्र महागाई कमी आहे. इतर देशांपेक्षा रुपयाचे मूल्य चांगले आहे. पण डॉलरच्या तुलनेत रूपया घसरतोय हे नक्की , पण सध्या रूपया ४५ पैशांनी वाढ झाली आहे, असंही कराड म्हणाले.
('मी मुस्लीम आहे, पांडुरंग माझं आधी ऐकेल'; अब्दुल सत्तारांचं देवाकडे 'हे' साकडं)
'राज्यात सध्या शिंदे- फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार असल्याने विकासासाठी निधी कमी पडणार नाही.पंढरपूर - फलटण रेल्वेसाठी ही निधी उपलब्ध करून दिली जाईल. राज्यात सत्तांतर होईल हे महाविकास आघाडीचे दिवा स्वप्न राहिलं असा टोलाही भागवत कराड यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news