गेल्या 48 तासांत 222 कोरोना योद्ध्यांना संसर्ग; 3 पोलिसांनी गमावला जीव

गेल्या 48 तासांत 222 कोरोना योद्ध्यांना संसर्ग; 3 पोलिसांनी गमावला जीव

जनतेने कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून रात्रंदिवस पोलीस तैनात आहेत. त्यात त्यांच्यापैकी अनेकांचा या महासाथीत जीव गमवावा लागला

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्रात तर सर्वसामान्यांबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची संख्या वाढत असताना दिसत आहे. गेल्या 48 तासांत राज्यात 222 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय तिघांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे आतापर्यंत कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकून 5935 पर्यंत पोहोचली आहे. ज्यामध्ये 74 जणांचा मृत्यू झाला इसून 4715 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यामध्ये अजित पवार यांनी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad) पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. 13 जुलै ते 28 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे.

हे वाचा-विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काँग्रेस नेत्यांनी साधला निशाणा, उपस्थित केला सवाल

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बुधवारी 1618 कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून 1803 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर 1032, पिंपरी चिंचवड 573, पुणे ग्रामीण 137 अशी रुग्णांची संख्या आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 10, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या