इंदुरीकर महाराज कायदेशीररित्या बाजू मांडणार, भक्त मंडळींना पत्रक काढून केलं आवाहन

इंदुरीकर महाराज कायदेशीररित्या बाजू मांडणार, भक्त मंडळींना पत्रक काढून केलं आवाहन

या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी...

  • Share this:

अहमदनगर, 17 फेब्रुवारी : आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख (Indorikar Maharaj) हे सध्या आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले आहेत. 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचं दिसलं होतं. त्यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे. दरम्यान इंदुरीकर महाराजांवर विविध भागातून विरोध दर्शविला जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या भक्तांनी महाराजांवरील आरोपावर निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणीही मोर्चा, आंदोलन काढू नये असं म्हटलं आहे. वारकरी हा शांतताप्रिय संप्रदाय आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं काही करू नये. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी आपण शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

First published: February 17, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या