इंदुरीकर महाराज आपल्याच किर्तनामुळे अडचणीत, होणार गुन्हा दाखल

इंदुरीकर महाराज आपल्याच किर्तनामुळे अडचणीत, होणार गुन्हा दाखल

लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे

  • Share this:

अहमदनगर, 11 फेब्रुवारी : लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात

गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध किर्तनकार  इंदोरीकर महाराज देशमुख हे सध्या आपल्या एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या  पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.

गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या वक्तव्याने हभप इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे.

इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ 'मराठी कीर्तन व्हिडिओ' या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसलं होतं.  हे विधान करताना इंदुरीकर महाराजांनी थेट पीसीपीएनडीटी कायद्याचेच उल्लंघन केल्याचं उघडकीस आलंय.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

पीसीपीएनडिटी च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडीओ, वृत्तपत्रातील बातम्या यावर आता हभप इंदोरीकर महाराजांना नोटीस पासून खुलासा मागवला आहे. यामुळे आपल्या कीर्तनातून प्रबोधनासोबतच हास्यफुलवणाऱ्या महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली असणार आहे. आता इंदोरीकर महाराज या गोष्टीला कसा प्रतिवाद करणार की एखाद्या कीर्तनातून आपल्या मिश्किल शैलीत समाचार घेणार ये येणाऱ्या काळात पुढे येणार आहे.

First published: February 11, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या