सम-विषमच्या फॉर्म्युल्यावर इंदोरीकरांचे वकिलामार्फत दिलं गुपचूप स्पष्टीकरण

सम-विषमच्या फॉर्म्युल्यावर इंदोरीकरांचे वकिलामार्फत दिलं गुपचूप स्पष्टीकरण

सम-विषमच्या फॉर्म्युलावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना अखेर वकिलामार्फत खुलासा करावा लागला.

  • Share this:

अहमदनगर,19 फेब्रुवारी: सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, अशी सम-विषमच्या फॉर्म्युलावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना अखेर वकिलामार्फत खुलासा करावा लागला. लिंग भेदभाव करणाऱ्या इंदोरीकरांच्या वक्तव्यानंतर त्यांना अहमदनगरचे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावली होती. आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. अखेर दिलेल्या कालवधीच्या शेवटच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत आरोग्य विभागाला स्पष्टीकरण दिले आहे.

शाळकरी विद्यार्थिनीला मास्तर म्हणाला... I LOVE YOU, संतप्त विद्यार्थ्यांनी केली अशी अवस्था

इंदोरीकरांचे वकील अॅड. शिवडीकर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात बुधवारी दुपारी आले होते. इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अॅड. शिवडीकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण दिले. यात इंदोरीकरांनी नेमकी काय भूमिका घेतली आणि काय स्पष्टीकरण दिले, ते समजू शकले नाही. विशेष म्हणजे अॅड शिवडीकर यांनी यावेळी माध्यमांपासून लांब राहणे पसंत केले. अॅड. शिवडीकर आपलं स्पष्टीकरण देऊन गुपचूप निघून गेले. दुसरीकडे, या संदर्भात माहिती देण्यास जिल्हा रुग्णालयाने नकार दिला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसानंतर इंदोरीकर आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती मिळाली आहे.

राम मंदिराप्रमाणे बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन करावी, शरद पवार यांचे मोठं वक्तव्य

ओझर येथील कीर्तन ठरले वादग्रस्त..

कीर्तनकार इंदोरीकर यांनी 'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' असे विधान ओझर येथे झालेल्या कीर्तनात त्यांनी केले होते. इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. अनेक सामाजिक संघटनांनी इंदोरीकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर यांनी महाराजांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले होते. या नोटिशीचा खुलासा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. अखेर इंदोरीकर महाराजांचे वकील अॅड. शिवडीकर यांनी आरोग्य विभागाला स्पष्टीकरण दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 09:49 PM IST

ताज्या बातम्या