Home /News /maharashtra /

इंदोरीकर महाराजांनी घेतला अंनिसच्या हस्तक्षेपावर आक्षेप, काय आहे प्रकरण...

इंदोरीकर महाराजांनी घेतला अंनिसच्या हस्तक्षेपावर आक्षेप, काय आहे प्रकरण...

पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत.

शिर्डी, 16 सप्टेंबर: पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराजांच्या प्रकरणाची बुधवारी संगमनेर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा सत्र न्यायालयात आज इंदोरीकर यांच्यातर्फे वकिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आक्षेप घेतला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात होणार आहे. हेही वाचा...आमदार बच्चू कडू यांनी कंगना रणौतची उडवली जोरदार खिल्ली, म्हणाले.... इंदोरीकर प्रकरणात मागील तारखेला सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली होती. आज पुन्हा या प्रकरणाची सुनावणी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात झाली. इंदोरीकर यांच्या वकिलांनी त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली. सरकार पक्षाबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितेनेही इंदोरीकर महाराजांविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली. या याचिकेला इंदोरीकर यांच्या वकिलांनी हरकत घेतली आहे. पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार असून आता या प्रकरणी न्यायालय नेमका काय निर्णय देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते' असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणी संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे. नेमकं इंदोरीकर महाराज काय बोलले ? 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.' हेही वाचा..तब्बल 9 महिन्यांनंतर सुटला गुंता! बेपत्ता वैष्णवीबाबत धक्कादायक माहिती उजेडात पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडीओ, वृत्तपत्रातील बातम्या यावर आता हभप इंदुरीकर महाराजांना नोटीस पासून खुलासा मागवला आहे. यामुळे आपल्या कीर्तनातून प्रबोधनासोबतच हास्यफुलवणाऱ्या महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली असणार आहे. आता इंदोरीकर महाराज या गोष्टीला कसा प्रतिवाद करणार की एखाद्या कीर्तनातून आपल्या मिश्किल शैलीत समाचार घेणार हे येणाऱ्या काळात पुढे येणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या