मोठी बातमी, 'त्या' आरोपातून इंदुरीकर महाराजांची होणार मुक्तता?

मोठी बातमी, 'त्या' आरोपातून इंदुरीकर महाराजांची होणार मुक्तता?

'इंदुरीकर महाराज यांनी ज्या ठिकाणी वक्तव्य केले आहे तो एक कीर्तनाचा कार्यक्रम होता'

  • Share this:

संगमनेर, 09 ऑगस्ट :  कीर्तनामध्ये आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांची कायदेशीर अडचणीतून सुटका होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल न्यायालयाने महत्त्वाचे निरिक्षण केले आहे.

'अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते' असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी संगमनेर जिल्हा न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. या प्रकरणी  अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निरीक्षण नोंदवले होते.

आता नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची खैर नाही, आरोग्य मंत्र्यांचा इशारा

'इंदुरीकर महाराज यांनी ज्या ठिकाणी वक्तव्य केले आहे तो एक कीर्तनाचा कार्यक्रम होता. या धार्मिक कार्यक्रमात लोकांना लिंग निदान किंवा तत्सम गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा कोणताही हेतू दिसून आला नाही.  जो व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. तो आता डिलीट करण्यात आला आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्याचा प्रसार करण्याचा कोणताही हेतू त्यात दिसत नाही. जाहिरात ‌करून पैसे कमवण्याचा हेतू नाही. निरिक्षणाच्या आधारे खटला चालवण्या‌ इतपत वस्तुस्थिती ‌दिसत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा भंग झाला आहे असे काही म्हण्याची परिस्थिती नाही', असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र  पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, गुलाबराव पाटलांनी फटकारले

नेमकं काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

Published by: sachin Salve
First published: August 9, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading