• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अखेर इंदुरीकर महाराजांनी चूक सुधारली, राजेश टोपेंनी काढली समजूत!

अखेर इंदुरीकर महाराजांनी चूक सुधारली, राजेश टोपेंनी काढली समजूत!

 काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं.

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं.

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं.

  • Share this:
जालना, 20 नोव्हेंबर :  कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी आपण कोरोना लस (corona vaccination) घेणार नाही, असं जाहीर केलं होतं. पण, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांना अखेरीस इंदुरीकर महाराज यांची समजूत काढण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांनी कोरोनाची लस घ्या, असं आवाहन करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी नाशिकमध्ये कीर्तनाच्या दरम्यान आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपण इंदुरीकर महाराज यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. अखेरीस  आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इंदुरीकर महराजांची जालन्यात भेट झाली. मराठमोळ्या तरुणाची कमाल! स्टार्टअपसाठी आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर आज जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला राजेश टोपे यांनी हजेरी लावून भेट घेतली. या भेटीनंतर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घेण्याचे कीर्तनातून आवाहन करणार असल्याचं वचन दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. एवढंच नाहीतर जालना येथील कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी प्रत्येकांनी लस घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं आहे. काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज? नाशिकमध्ये झालेल्या एका कीर्तन सोहळ्यात इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात म्हणाले होते की, 'प्रत्येक माणसाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करणार. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा' Mumbai:होणाऱ्या बायकोला अश्लील मेसेज पाठवणे हा गुन्हा? जाणून घ्या कोर्टाचा निकाल एकीकडे संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असतानाच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे सार्वजनिकपणे नागरिकांना सांगत असल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.  अखेरीस आज थेट आरोग्यमंत्र्यांनाच त्यांची समजूत काढावी लागली, पण इंदुरीकर महाराज कधी लस घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
First published: