Home /News /maharashtra /

इंदोरीकर महाराज अडचणीत; 'त्या' वक्तव्याविरोधात अंनिसची औरंगाबाद खंडपीठात याचिका

इंदोरीकर महाराज अडचणीत; 'त्या' वक्तव्याविरोधात अंनिसची औरंगाबाद खंडपीठात याचिका

इंदोरीकर महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

अहमदनगर, 6 मे: प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर न्यायालयात (Sangamner Court) दाखल खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. कारण, संगमनेर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर आता अंनिसने (Annis) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad bench of Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांची निर्दोष मुक्तता केल्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पुन्हा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केले आहे. अंनिसच्या राज्यसचिव तसेच याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या याचिकेमुळे आता इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे. वाचा: सम-विषम वक्तव्य प्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता इंदोरीकर महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. स्री संग सम तिथीला केल्यास मुलका होतो तर विषम तिथीला केल्यास मुलगी होते असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कार्यक्रमात केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात अंनिसने संगमनेर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराज कसे दोषी आहेत याची बाजू कोर्टात मांडली. तर इंदोरीकर यांची बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली. अखेर संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar

पुढील बातम्या