इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाच्या सुनावणीला नवे वळण

इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाच्या सुनावणीला नवे वळण

इंदोरीकर महाराज वादगस्त वक्तव्य प्रकरणी आज संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती.

  • Share this:

 शिर्डी, 25 नोव्हेंबर : पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर ( indurikar maharaj) महाराजांच्या प्रकरणाला आज नवीन मिळाले. या प्रकरणाच्या सुनावणी आधी अचानक सरकारी वकिलांनी माघार घेतल्यामुळे गोंधळ उडाला. आता पुढील सुनावणी पूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करण्याची मागणी

इंदोरीकर महाराज वादगस्त वक्तव्य प्रकरणी आज संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, अचानक सुनावणीच्या काही तासांआधीच सरकारी वकिलांनी माघार घेतली. सरकारी वकिलांनीच माघार घेतल्यामुळे आज सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील  सुनावणी 2 डिसेंबर रोजी होणार आहे.  आज दोन्ही बाजुंनी युक्तिवाद केला जाणार होता. पण  सरकारी वकिलांनी अचानक खटल्यातून माघार घेतली.

प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ

आता पुढील सुनावणीपूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावा अशी मागणी  अंनिसच्या रंजना गवांदे यांनी केली आहे.

नेमकं इंदोरीकर महाराज काय बोलले ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

'आता तुम्ही चौकशीला घाबरलं पाहिजे', राऊतांनी दिले भाजप नेत्याच्या चौकशीचे संकेत

या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं हे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांची नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती. त्यामुळे अखेर 19 जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी गुन्हा दाखल केला.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 1:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या