7 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी

7 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी

हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना इंदोरीकरांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 18 फेब्रुवारी : हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना इंदोरीकरांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले होते. यानंतर त्यांच्या बाजूने आणि विरोधात अनेकांनी मत व्यक्त केली होती. मात्र इंदोरीकरांनी माफी मागत भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एक पत्र जारी केले आहे.

इंदोरीकर महाराजांनी आपल्या पत्रात, महिलावर्गाची माफी मागितली आहे. तसेच 26 वर्षांपासून मी किर्तनरुपी समाजप्रबोधन करत आहे. त्यामुळं माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही इंदोरीकर महाराजांचे म्हणणे आहे.

वाचा-नवा खुलासा! कसाबला दिलं होतं हिंदू नाव, अरुणोदय कॉलेजचं तयार केलं होतं ओळखपत्र

वाचा-अखेर सामनातील नाणार जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा खुलासा

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महारांजवर टीका केली होती. त्यानंतर अनिस संस्थेने इंदोरीकर महाराजांना माफी मागण्यास सांगितले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

सल्लागार समितीने बजावली इंदुरीकर महाराजांना नोटीस

दरम्यान, कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडीटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडीटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली होती. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार होता.

वाचा-मुस्लिमांच्या कब्रवर राम मंदिराची उभारणी? अयोध्येच्या 9 जणांचं ट्रस्टला पत्र

नेमकं इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

First published: February 18, 2020, 12:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या