'मी तसं बोललोच नाही...', इंदोरीकर महाराजांनी केला अजब दावा

'मी तसं बोललोच नाही...', इंदोरीकर महाराजांनी केला अजब दावा

इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 20 फेब्रुवारी : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. 'यूट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंगदेखील करत नाही. मी तसं वक्तव्य केलं नाही,' असा दावा या उत्तरात इंदोरीकर महाराजांनी केला आहे.

'मी ते वाक्य बोललोच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्याने महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाला आहे. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,' असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी आपली बाजू मांडली आहे.

इंदोरीकरांवर कारवाई होणार?

इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठं रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई होणार का, यावर चर्चा सुरू आहे. यावर बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर म्हणाले की, 'इंदोरीकर महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी तसं बोललं नसेल तर उत्तर समाधानकारक आहे. मात्र ज्या वर्तमानपत्रात इंदोरीकर महाराज यांनी असं वक्तव्य केल्याचं छापून आले आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही नोटीस पाठवली आहे की, तुम्ही कोणत्या आधारे असा दावा केला आहे. त्यांनी मात्र उत्तर अजून दिले नाही. त्यांनी पुरावे द्यावे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही.'

मोदी-शहांमध्ये विकृत मानसिकता, कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची सडकून टीका

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाइमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,' असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटल्याचं एका व्हिडिओत दिसत आहे.

First published: February 20, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या