कोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती !

कोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती !

संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहली आहे.

  • Share this:

इंदूर, 13 जून : भय्यूजी महाराज त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. पण आत्महत्येनंतर त्यांची आणखी एक सुसाईट नोट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे.

त्यात त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहली आहे.

'विनायक माझ्या विश्वासार्ह आहे. विनायक माझ्या वित्त, मालमत्ता आणि बँक खात्याची सर्व जबाबदारी घेईल. हे कोणत्याही दबावाखाली लिहिलेले नाही.' असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आलं आहे.

भय्यूजी महाराजांचे सगळ्यात जवळ असणारे हे विनायक मूळतः महाराष्ट्रातील अहमदनगरचे आहेत. दोन दशकापूर्वी विनायक इंदूरहून महाराष्ट्रात आले होते. काही दिवस इंदूरमध्ये राहिल्यानंतर तिथल्या स्थानिकांच्या मदतीने ते भय्यूजी महाराज यांच्या संपर्कात आले. वेळेच्या पाठोपाठ, विनायक यांनी त्यांच्या कामाने भय्यूजी महाराज यांचा विश्वास जिंकला होता.

काही वर्षांत विनायक भय्यूजी महाराज यांचे सर्वात विश्वसनीय व्यक्ति बनले. खरंतर, विनायक यांच्या आधी एका दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. पण विवाह झाल्यानंतर त्यांनी महाराजांपासून लांब राहणं पसंत केलं आणि नंतर भय्यूजी महाराजांनी सर्व जबाबदाऱ्या विनायक यांच्याकडे सोपवल्या.

भय्यूजी यांच्या आयुष्याशी संबंधित सगळ्या गोष्टी विनायक यांना माहित असायच्या. त्यांच्या प्रत्येक निर्णयात विनायक यांचा हस्तक्षेप असायचा. इतकंच काय तर भय्यूजींच्या पहिल्या पत्नीच्या निधनांतर त्यांच्या मुलीची जबाबदारीही विनायक यांनी उचलली.

ज्या वेळी भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळ्या घालून घेतल्या तेव्हीही विनायक घरीच होता.

First published: June 13, 2018, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading