हरिष दिमोटे 3 मार्च : देशी बियाणं गोळा करून महाराष्ट्रात शेती संवर्धानाचं मोठं काम उभ करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय. त्यांच्या बीज बँकेचं लोकार्पण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडलं. 'न्यूज18 लोकमत'ने यासाठी पाठपुरावा केला होता. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन आणि आर्थिक मदत मिळवून राहिलीबाईंचं स्वप्न पूर्ण केलंय.
बीज संवंर्धनाचे काम करणार्या राहीबाईंनी महाराष्ट्रात मोठं काम उभं केलं होतं. दुर्मिळ होत जाणाऱ्या असंख्य देशी बियाण्यांचं जतन आणि संवर्धन त्यांनी केलं आहे. पण हे काम करत असताना त्यांना बियाणे ठेवायला साधं घरही नव्हतं. अतिशय छोट्या आणि मातीच्या घरात त्यांना बियाणं ठेवावं लागतं होतं. त्यांची ही व्यस्था 'न्यूज18 लोकमत'ने पुढे आणली आणि अनेक मदतीसाठी अनेक हात पुढे आले आणि त्यातूनच उभी राहिली अस्सल देशी बियाण्यांची बँक.
'न्यूज18 लोकमत'च्या सन्मान बळीराजाचा या पुरस्कार वितरण सोहळ्यात महसूलमंत्री चंद्रकांत दादांनी राहीबाईंना सुसज्ज बिज बँक बांधून देण्याचे वचन दिले होते. आणी त्यांनी त्यांची वचनपुर्तीही त्यांनी केली. अवघ्या 35 दिवसात 3000 स्वेअर फुटाचे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. या परिसराला साजेशी अशी अद्ययावत बिज बॅन्क उभी राहिल्याने राहीबाईचे काम जगासमोर जाण्यासाठी आणखी गती मिळणार आहे.