कोरोनाचं केंद्र झालेल्या युरोपमध्ये अडकले भारतातील 37 विद्यार्थी, सुविधातच मिळत नसल्याने भीती

कोरोनाचं केंद्र झालेल्या युरोपमध्ये अडकले भारतातील 37 विद्यार्थी, सुविधातच मिळत नसल्याने भीती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प असल्याने लाखो भारतीय परदेशात अडकले आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : 'कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील 37 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरू आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय, विदेश मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,' अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

रीगा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांनी भीतीपोटी माझ्याशी संपर्क केला आहे. विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर संपर्क झाला. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,' असं उदय सामंत म्हणाले.

'भारतातील 37 विद्यार्थी असून महाराष्ट्रातील 8 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या सर्वांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, शासन आपल्याला मदत करेल,' असा विश्वास विध्यार्थ्यांना उदय सामंत यांनी दिला आहे.

पर्यटकही अडकले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प असल्याने लाखो भारतीय परदेशात अडकले आहेत. भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले 34 पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत.

नाहूर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे हे दाम्पत्य अडकले आहे. तर मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत.

First published: March 27, 2020, 2:17 PM IST

ताज्या बातम्या