धक्कादायक! गणेश विसर्जनाला गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू

धक्कादायक! गणेश विसर्जनाला गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे.

  • Share this:

नाशिक, 1 सप्टेबर: आज आज अनंत चतुर्दशीला राज्यभर आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे. देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. प्रशांत वसंत गुंजाळ (वय-27) असं मृत लष्करी जवानाचं नाव आहे.

हेही वाचा...मिरवणूक नाही, आवाज नाही; पुण्यात मानाच्या गणपतीचं विसर्जन कसं झालं पाहा...

प्रशांत गुंजाळ हे अरुणाचल प्रदेशात लष्करात कार्यरत आहेत. नुकतेच ते 2 महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आले होते आणि गणेश विसर्जनासाठी गेल्यानंत प्रशांत गुंजाळ यांच्यावर दुर्दैवी मृत्यू ओढवला.

मिळालेली माहिती अशी की, प्रशांत गुंजाळ हे 26 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते. प्रशांत यांचं घर मळ्यात आहे. त्यामुळे मळ्यातील विहिरीवर ते गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. या दरम्यान प्रशांत गुंजाळ यांचा तोल गेल्यानं ते थेट विहिरी पडले. विहीर खोल आहे. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे विहिरीला पाणी देखील जास्त आहे.

हेही वाचा...शिवसेना-MIM आमने-सामने; खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिर आंदोलन घेतलं मागे

तब्बत तासभरानंतर जवान प्रशांत यांचा मृतदेह शोधण्यात स्थानिक तरुणांना यश आलं. ही बातमी वखारीसह परिसरात वाऱ्यासारखी परसरी. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली केली आहे. प्रशांत गुंजाळ यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या दुर्दैवी घटनेनी वखारी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2020, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading