मुंबई, 17 जुलै : तुमच्याकडे नर्सिंगची पदवी आहे? आणि तुम्हाला सरकारी नोकरी हवीय. मग एक उत्तम संधी चालून आलीय. सेंट्रल रेल्वेनं नोटिफिकेशन जारी करून स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागितलेत. या पदांसाठी वाॅक इन इंटरव्ह्यू होऊन निवड होईल. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी 29 जुलैला या इंटरव्ह्यूसाठी यावं. त्याची माहिती पुढे दिलीय. रेल्वे 31 स्टाफ नर्स पदांसाठी भरती करतेय.
हा इंटरव्ह््यू 29 जुलैबरोबर 30 जुलैलाही होईल. उमेदवार बाहेरगावहून येणार असतील तर तशा तयारीनं यावं.
स्टाफ नर्ससाठी योग्यता
शैक्षणिक योग्यता
1. रजिस्टर्ड नर्स किंवा मिडवाइफचं सर्टिफिकेट हवं.
2. जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये कोर्स केल्याचं सर्टिफिकेट किंवा नर्सिंगमध्ये B.Sc हवं.
वयाची मर्यादा
20 ते 40 वर्षापर्यंत उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही या वयोगटात असाल तर अर्ज करून इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता.
'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे
इंटरव्ह्यूचं ठिकाण
उमेदवारांना वाॅक इन इंटरव्ह्यूसाठी पुढील पत्त्यावर जावं लागेल
चीफ मेडिकल सुपरीटेंडेंट ऑफिस,
डिव्हिजनल रेल्वे, हाॅस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भुसावळ, महाराष्ट्र
नोकरी मिळणं होईल सोपं, सरकार देणार नव्या जमान्याचं ट्रेनिंग
महत्त्वाची तारीख
वाॅक इन इंटरव्ह्यू 29 जुलै 2019 ला आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
MIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज
दरम्यान,रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डानं 500 हून जास्त उमेदवारांची वेगवेगळ्या पदांवर भरती सुरू केलीय. या पदांमध्ये ज्युनियर इंजीनियर, क्लार्क, स्टेशन मास्टर, नर्सिंग सुप्रिटेंडेंट, लोको इन्स्पेक्टकर आणि सीनियर रेजिडेंट यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी www.indianrailways.gov वर अर्ज करावा. या उमेदवारांची भरती सेंट्रल रेल्वे, साउथ वेस्टर्न रेल्वे, नाॅर्थ इस्ट फ्रंटइयर रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साउथ इस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत केली जाईल.
पश्चिम रेल्वेनं भरती सुरू केलीय. अनेक पदांवर या व्हेकन्सीज आहेत. स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कमर्शियल कम टिकट क्लर्क, ट्रेनों क्लर्क या पदांसाठी पश्चिम रेल्वेनं भरती सुरु केली आहे. 1 जुलैपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2019 ही आहे.
VIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक