Home /News /maharashtra /

देशासाठी 3 वीर शहीद! कोणाची लेक झाली पोरकी तर कोणाची हळदही नव्हती उतरली

देशासाठी 3 वीर शहीद! कोणाची लेक झाली पोरकी तर कोणाची हळदही नव्हती उतरली

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीमेवर दोन जवान शहीद झाल्याची दु:खद बातमी आली. यात महाराष्ट्रातील साताऱ्याचे जवान संदीप सावंत यांना दोन महिन्यांपूर्वीच मुलगी झाली होती.

    मुंबई, 03 डिसेंबर : देश नव्या वर्षाचे स्वागत करत असताना सीमेवर दोन जवान शहीद झाल्याची बातमी आली. यात महाराष्ट्रातील एक जवान होता. त्याच दिवशी पंजाबमध्ये युद्ध सराव करताना साताऱ्यातील एका जवानाला वीरमरण आलं. तर दिल्लीत लागलेली आग विझवणाऱ्या आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानालाही प्राण गमवावे लागले. हे तीनही जवान तरुण होते. दोन-तीन वर्षांपूर्वीच रुजू झालेले. आयुष्याची नवी सुरुवात केली असतानाच देशाची सेवा करताना त्यांना वीरमरण आलं. कोणाची लेक परकी झाली तर कोणाची अजुन हळदही उतरली नव्हती. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. 1 जानेवारी नव्या वर्षातील पहिलाच दिवस साताऱ्यात दु:खद बातमी घेऊन आला. कराडमधील जवान संदीप सावंत यांना नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. त्यांना दोनच महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. त्यांच्या जाण्याने लेक पोरकी झाली आणि कुटुंबाचा आधारही गेला. त्यांच्यावर साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंजाबमध्ये युद्ध सराव सुरू असताना बुधवारी बीडचे जवान महेश तिडके शहीद झाले. परळी तालुक्यातील लाडझरी गावचे महेश तिडके तीन वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाडझरी गावासह परळी तालुक्यात शोककळा पसरली. लाडझरी येथे गुरूवारी सकाळी महेश यशवंत तिडके यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या सीमेवर दोन जवान शहीद झाल्याची बातमी ताजी असतानाच दिल्लीत एका फॅक्ट्रीमध्ये भीषण आग लागली होती. या आगीतून अग्निशामक दलाच्या जवानांनी 17 जणांना सुखरूप बाहेर काढलं. याचवेळी झालेल्या मोठ्या स्फोटाने इमारतीचा काही भाग कोसळला. यावेळी अमित बालियान नावाचा जवान इतर अडकलेल्या लोकांची सुटका करत होता. त्यानं आपल्या जीवाची बाजी लावून 3 जणांना वाचवलं. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. एक वर्षापूर्वी अग्निशमन दलात दाखल झालेल्या अमितचे काही महिन्यांपूर्वी लग्न झलं होतं. त्याची पत्नी पोलिस कॉन्स्टेबल आहे. मराठवाड्याचा सुपुत्र शहीद, नववर्षाच्या सुरुवातीलाच दु:खद बातमी दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण, 2 महिन्यांची लेक पोरकी
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Indian army, Maharashtra

    पुढील बातम्या