मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापुरात वसाहतीजवळ आला रानगव्याचा कळप, LIVE VIDEO

कोल्हापुरात वसाहतीजवळ आला रानगव्याचा कळप, LIVE VIDEO


कोल्हापूर शहराजवळ लक्षतिर्थ वसाहत इथं गुरुवारी रात्रीच्या सुमारास 4 गवे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोल्हापूर शहराजवळ लक्षतिर्थ वसाहत इथं गुरुवारी रात्रीच्या सुमारास 4 गवे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोल्हापूर शहराजवळ लक्षतिर्थ वसाहत इथं गुरुवारी रात्रीच्या सुमारास 4 गवे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोल्हापूर, 26 डिसेंबर : पुण्यात दोन रानगवे (ndian gaur)आढळून आल्यानंतर आता कोल्हापूर (Kolhapur) शहराजवळच 4 रानगवे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोकवस्तीला लागून आलेल्या भागात रानगव्यांचं दर्शन झाल्यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कोल्हापूर शहराजवळ लक्षतिर्थ वसाहत इथं गुरुवारी रात्रीच्या सुमारास 4 गवे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिव्हाळा कॉलनी आणि नंतर हे गवे शिंगणापूरच्या दिशेने उसातून निघून गेले. एकूण 5 गव्यांचा कळप होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. वनक्षेत्रपाल विजय पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सर्व परिसर पिंजून काढला. मात्र, गव्याचा कळप दिसून आला नाही. दाट वस्ती सोडून निर्जनस्थळाच्या दिशेने गवे निघून गेले आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कोणत्याही कारणास्तव घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी यांनी केले. IND vs AUS : रवी शास्त्री रोहित-राहुलची कारकीर्द खराब करतायत? काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड आणि बावधन परिसरात गवे आढळून आले होते. कोथरूडमध्ये रानगवा रेस्क्यू करत असताना रानगव्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बावधनमध्येही 22 डिसेंबर रोजी रानगवा आढळून आला. पुण्यातील बावधान परिसरात हायवे लगत अचानक एका रानगव्याचे दर्शन झाले. हायवेच्या बाजूला असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आलेला होता. पुण्यात दुसऱ्यांदा गवा आल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी  रेस्क्यू करण्यासाठी  घटनास्थळी उपस्थित झाले होते. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने त्याला परत पाठवले होते.
First published:

पुढील बातम्या