Home /News /maharashtra /

..अन् गजानं प्राण सोडले; 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद असलेल्या बैलाचं निधन

..अन् गजानं प्राण सोडले; 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद असलेल्या बैलाचं निधन

कृष्णा साईमते यांच्या या गजा बैलाचं वय 10 वर्ष 6 महिने होतं. या बैलाची नोंद एक टन वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबी यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Record) झाली होती.

    सांगली 01 जुलै : सांगलीच्या (Sangli) मिरजमधील कसबे डीग्रज इथल्या गजा बैलाचं निधन झालं (Death of Gaja Bull) आहे. कृष्णा साईमते यांच्या या गजा बैलाचं वय 10 वर्ष 6 महिने होतं. या बैलाची नोंद एक टन वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबी यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Record) झाली होती. कृष्णा साइमते आणि गजाची जवळपास मागील दहा वर्षांपासून अगदी जिगरी मैत्री होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला. यानंतर अचानक आलेल्या अटॅकमुळे गजानं गोठ्यातच प्राण सोडले. गजानं केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातही कृषी प्रदर्शनादरम्यान डंका केलेला. पोटच्या पोराप्रमाणं सांभाळ केलेल्या गजाच्या मृत्यूमुळे साईमते कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासाठी गजाच्या जाण्याचं दुःख हे घरातील एक सदस्या गमावल्यासारखंच आहे. म्हणूनच गजाचा मालक कृष्णा साईमते मोठमोठ्या रडतोय तर कृष्णाची बहीणही गजाच्या अंगावर डोकं ठेवून रडत आहे. गज्याच्या जाण्यानं कुटुंबीयांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. घरातील सगळेच सदस्य धाय मोकलून रडत आहेत. शरीरावर प्रयोग करू नका! कोरोना ऐवजी काढा पिण्यानेच जावं लागेल रुग्णालयात गजाला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवू नये यासाठी मालक कृष्णा साईमतेनं काहीही कसर सोडली नाही. त्यांनी गजासाठी गोठ्यात फॅनचीही व्यवस्था केली होती, गजाला त्यांनी कधीही खाण्या-पिण्याचीही कमी पडू दिली नाही. दहा वर्षांच्या या काळात गजा आणि कृष्णा यांच्यात अगदी खास नातं बनलं होतं. कृष्णा नेहमीच गजाला वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये घेऊन जात आणि त्याची देखभाल करण्यात कोणतीही कसर सोडत नसे. पडळकरांच्या गाडीवर दगडफेक प्रकरण चिघळणार; कार्यकर्ते आक्रमक, Live Video सगळं अगदी सुरळित सुरू होतं. मात्र, मागील वर्षी कोरोनानं देशभरात थैमान घातलं आणि लॉकडाऊन तसंच विविध निर्बंधांमुळे मोठी कृषी प्रदर्शनंही भरली नाहीत. त्यामुळे, गजाला आपला डंका वाजवण्याची संधी मिळाली नाही आणि कृष्णाची कमाईदेखील बंद झाली. मात्र, तरीही मालकानं गजाची पूर्णपणे काळजी घेतली. काही दिवसांपूर्वीच गजा बैलाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही आणि गजानं या जगाचा निरोप घेतला. गजाच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहाव्या म्हणून कृष्णानं आता शरीराचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. गजाचे स्केलेटन करुन त्याच्या हाडाचा सापळा ठेवला जाणार आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bull attack, Sangali, Viral news

    पुढील बातम्या