भारतीय लष्कराचा तिसरा Surgical Strike, उद्धवस्त केले दहशतवाद्यांचे तळ

भारतीय लष्कराचा तिसरा Surgical Strike, उद्धवस्त केले दहशतवाद्यांचे तळ

तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांच्या अनेक छावण्या, तळ आणि केंद्र उद्धवस्त झालीत.

  • Share this:

नवी दिल्ली 15 मार्च : भारतीय लष्कराने पाकिस्तानातल्या  बालाकोट इथं हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. त्याची शौर्यगाथा अजुनही देशभर चर्चेचा विषय आहे. असं असतानाच आता लष्कराच्या तिसऱ्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती समोर आलीय. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्कराने उद्धवस्त  केले आहेत.

म्यानमारच्या लष्करासोबत संयुक्त कारवाई करून भारतीय लष्कराने ही कामगिरी फत्ते केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारीला ही कारवाई सुरू झाली आणि 2 मार्चला संपली. तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांच्या अनेक छावण्या, तळ आणि केंद्र उद्धवस्त झालीत.

भारत आणि म्यानमारच्या सीमेवर रोहिंग्या, अराकान आर्मी आणि NSCN (K) या दहशतवादी संघटनेने तळ निर्माण केले होते. त्या भागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. याची माहिती मिळाल्यानंतर भारताचं लष्कर आणि म्यानमार लष्कराने संयुक्त योजना आखून ही धडक कारवाई केली.

या कारवाईमुळे या भागातल्या अनेक दहशतवाद्यी संघटनांचं कंबरड मोडल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी भारताने तिसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक केलं मात्र त्याची माहिती  सांगणार नाही असं म्हटलं होतं.

26 फेब्रुवारीला भारताच्या हवाई दलाच्या मिग-21 या लढाऊ विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोट इथं पहाटे हल्ला करून जैश ए मोहम्मदचा तळ उद्धवस्त केला होता. त्यात किती दहशतवादी ठार झाले हे अधिकृत जाहीर करण्यात आलं नसलं तरी त्यात 250 ते 300 अतिरेकी मारले गेल्याची अनधिकृत माहिती आहे.

First published: March 15, 2019, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading