मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सीमेवर लढणारे हात मराठवाड्याच्या दऱ्याखोऱ्यात फुलवताहेत 'हिरवं स्वप्न'

सीमेवर लढणारे हात मराठवाड्याच्या दऱ्याखोऱ्यात फुलवताहेत 'हिरवं स्वप्न'

अनेक ठिकाणी वृक्षारोपण होत मात्र त्यानंतर त्या झाडांचे काय झाले याचा हिशेब कुणी ठेवत नाही. या अनोख्या युद्धात आम्ही दुष्काळावर मात करू असा विश्वास या जवानांना आहे.

अनेक ठिकाणी वृक्षारोपण होत मात्र त्यानंतर त्या झाडांचे काय झाले याचा हिशेब कुणी ठेवत नाही. या अनोख्या युद्धात आम्ही दुष्काळावर मात करू असा विश्वास या जवानांना आहे.

अनेक ठिकाणी वृक्षारोपण होत मात्र त्यानंतर त्या झाडांचे काय झाले याचा हिशेब कुणी ठेवत नाही. या अनोख्या युद्धात आम्ही दुष्काळावर मात करू असा विश्वास या जवानांना आहे.

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद,ता. 22 नोव्हेंबर : झाडांमुळेच आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. पण आता झाडांची संख्या कमी कमी होत आहे आणि त्याचा परिणाम पावसावर होतोय. पाऊस बेभरवशाचा झाल्यानं निसर्गचक्र बिघडलंय. ज्या भागात जंगलं समृद्ध आहेत त्या भागात पावसाची सरासरी चांगली आहे. मराठवाड्यात मात्र जंगलांचा प्रमाण केवळ 1 टक्के असल्यानं पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतो. मात्र आता राज्य सरकारचा वनविभाग आणि देशाचं लष्कर एक वेगळा प्रयोग करीत आहे.

महार रेजिंमेंटच्या इको बटालियनचे सुभेदार राजेश गाडेकर आणि त्यांची बटालियन ही सीमेवर तैनात नाही तर ही बटालियन तैनात आहे औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या डोंगर रांगांमध्ये ही बटालियन चक्क झाडांची देखभाल करीत आहे. नुसती झाडांची देखभाल आणि रक्षण नाही तर वृक्षारोपण करून त्या झाडांना जगवण्याची मोठी कामगिरी ही बटालीयन करत आहे. त्यामुळं या बटालियनला 'इको बटालियन' असं नाव ठेवण्यात आलंय.

सुभेदार राजेश गाडेकर आपल्या बटालियन सोबत सकाळी सहा वाजता दौलताबादच्या डोंगरात येतात. काय काम करायचे हे ठरवतात आणि कामाला लागतात. लष्करी अधिकारी असले तरी तरी ते शास्त्रेाक्त पद्धतीने झाडांची जोपासना करतात.

सीमेवर शत्रूच्या जवानांना पाणी पाजणारे हे लढवय्या आज दऱ्या खोऱ्यातल्या झाडांना पाणी देण्याचं काम करताहेत. पाणी दिल्यानंतर जमिनीतील ओलावा राहावा म्हणून गवताचा, नारळाचा काथ्या टाकून ओलावा टिकवण्याचं कामही ते करत आहेत.

लष्कराचे जवान शिस्त आणि कठोर परिस्थितीत काम उत्तम करतात. दौलताबादच्या डोंगरमाथ्यावर लावलेली 52 हजार झाडं जगवण्याची जबाबदारी या बटालियनवर आहे. लावलेल्या झाडांपैकी 95 टक्के झाडं या जवानांनी जीवापाड मेहनत करून जगवली. झाडांची झालेली चांगली वाढ बघून कठोर मनाच्या जवानांच्या डोळ्यातही दाटून येतं.

राज्यात अश्या पद्धतीची एकच इको बटालियन आहे आणि ती मराठवाड्यात झाडं वाढवण्याचे कठीण काम करीत आहे वनविभाग आणि लष्कराचा हा संयुक्त उपक्रम आहे. अनेक ठिकाणी वृक्षारोपण होत मात्र त्यानंतर त्या झाडांचे काय झाले याचा हिशेब कुणी ठेवत नाही. या अनोख्या युद्धात आम्ही दुष्काळावर मात करू असा विश्वास या जवानांना आहे.

First published:

Tags: Eco batalian, Indian army, Maharashtra forest department, Marathwada, Tree plantation, ईको बटालियन, जंगल, जवान, मराठवाडा, लष्कर