वेलिंगटन, 31 जानेवारी: न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यातही टीम इंडियानं अत्यंत थरारक असा विजय मिळवत इतिहास रचला आहे. सुपर ओव्हरमध्ये सलग दुसरा टी-20 सामना जिंकत टीम इंडियानं आपणच सुपर डूपर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर सुपर ओव्हर आणि न्यूझीलंडचा पराभव हे नातं आता आणखीणच घट्ट झालंय. वेलिंगटनमध्ये झालेला चौथा टी-20 सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसह प्रेक्षकांच्या पोटात गोळा आला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियासमोर 14 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या टीमनं त्याला चोख प्रत्यूत्तर देत सनसनाटी विजय मिळवत सामना आपल्या नावावर केला. सुपर ओव्हरमध्ये सलग दुसरा विजय मिळण्याचा पराक्रम करणारा भारत पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनं भारतीय प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
न्यूझीलंडची पुन्हा सुपर ओव्हरशी गाठ
1 - न्यूझीलंडकडून टीम सीफर्ट आणि कॉलिन मनरो पहिल्यांदा मैदानात उतरले. पहिल्याच चेंडूवर टीम सीफर्टने लेग साईडला चेंडू मारला. त्यावर 2 रन्स मिळाल्या.
दुसऱ्या चेंडूवर सीफर्टनं ऑफ साईडला चौकार ठोकला
बुमराहच्या तिसऱ्या चेंडूवर सीफर्टने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बँटला लागून गेला पण के एल. राहूल कॅच पकडू शकला नाही.
बुमराहने चौथ्या चेंडूवर सीफर्टला कॅच द्यायला भाग पाडलं.
पाचवा चेंडू शॉर्ट पीच होता. त्यावर कॉलिन मनरोने जबरदस्त चौकार मारला
सहाव्या चेंडूवर कॉलिन मनरोने एक रन काढली. अशा प्रकारे टीम इंडियासमोर 14 धावांचं आव्हान होतं.
टीम इंडियाकडून धुलाई
टीम इंडियाकडून केएल राहुल आणि विराट कोहली बॅटिंगसाठी मैदानात उतरले. केएल राहुलने पहिल्याच चेंडूवर सिक्सर लगावला.
दूसरा चेंडूवर केएल राहुलने चौकार ठोकला
तिसऱ्या चेंडूवर केएल राहूल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर संजू सैमसन मैदानात उतरला.
विराट कोहलीनं चौथ्या चेंडूवर हलक्या हातानं खेळत दोन धावा चोरल्या. आता टीम इंडियाला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज होती.
विराट कोहलीनं पाचव्या चेंडूवर जबरदस्त चौकार मारत ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.