आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

'मन की बात' चा शेवटचा भाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आज अखेरचा भाग असणार आहे. आज सकाळी 11 वाजता हा शेवटचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

अधिवेशनापूर्वी चहापान

राज्य सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तर संध्याकाळी सत्ताधारी युती सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी चहापानासाठी सर्वपक्षीयांना आमंत्रण दिले आहे.

पर्रिकर रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं आहे. एंडोस्कोपीसाठी त्यांना रूग्णालयात आणण्यात आलं आहे. पुढील 48 तास त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान कुंभमेळ्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणार आहे. त्रिवेणी संगमावर ते अंघोळ करतील. आणि त्यानंतर सभेला संबोधन करणार आहे.

राज ठाकरे कोल्हापुरात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात दर्शनाला जाणार आहे. सकाळी ८वाजता ते कोल्हापुरात असणार आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे लोकसभेच्या तयारी लागणार आहे.

First published: February 24, 2019, 6:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading