अयोध्या प्रकणावर सुनावणी
अयोध्या खटल्यात मध्यस्थ नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ही सुनावणी होणार असल्याचं कळतंय. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खंडपीठ तयार करण्यात आले . यात जस्टिस रंजन गोगई, जस्टिस एस.ए बोबडे, एन.वी रमन्ना, यूयू ललित आणि डीवाई चंद्रचुड यांचा समावेश आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावर रस्सीखेच
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरूच आहे.अहमदरनगर आणि औरंगाबादची जागा एकमेकांना देऊन कॉंग्रेस- राष्ट्रवादी तोडगा काढण्याची शक्यता आहे. यासाठी आज मुंबईत बैठक होणार आहे.
'मातोश्री'वर बैठक
लोकसभेच्या मतदारसंघासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. सिंधुदुर्ग आणि उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.
गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड
गोकुळ दूध संघावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मंगळवारी रात्री 4 तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी करण्यात आली. आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय रित्या चौकशीही झाली. आयकर विभागाच्या धाडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कर्नाटकात काँग्रेसला धक्का; पहिला असंतुष्ट बाहेर
कर्नाटक राज्यात अजूनही भाजप आणि काँग्रेस जेडीएस या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरूच आहे. गुलबर्ग्याचे आमदार डॉ. उमेश जाधव यांनी विधानसभा सभापती के. आर. रमेशकुमार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजतंय. काँग्रेसबाहेर पडणारे ते पहिले असंतुष्ट आमदार आहेत.
==============