नरेंद्र मोदींची वर्ध्यात सभा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींची वर्ध्यात सभा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेना युतीचा प्रचारही सध्या जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  १ एप्रिलला  महात्मा गांधी यांच्या भूमीतून म्हणजे वर्धा येथून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे यवतमाळ इथं पक्षाचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यासाठी रॅली घेणार आहेत. पक्षातल्या वादांवर ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांची आज अमरावतीमध्ये सभा होणार आहे. निवडणुकीचं वातावरण तापू लागल्यानंतरची त्यांची ही पहिलीच सभा आहे त्यामुळे सगळ्याचं त्या सभेकडे लक्ष लागलं आहे.

अहमदनगरमधले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कोण नेते असतील याकडे सगळ्यांचं लक्ष  लागलंय.

स्वाभीमानी पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार निलेश राणे हे

आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नारायण राणे हे जरी NDA मध्ये असले तरी ही जागा शिवसेनेला गेल्याने निलेश राणे अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जेट एअरवेजचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. जेटच्या पायलटचे पगार रखडल्याने सोमवारपासून तब्बल 1 हजार पायलट संपावर जाण्याची शक्यता आहे. या आधीच जेटच्या फेऱ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यात पायलट संपावर गेल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading