दाऊद इब्राहिमवरून प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

'कुख्यात दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता. पण शरद पवारांमुळे ही संधी हुकली', असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 02:10 PM IST

दाऊद इब्राहिमवरून प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मुंबई, 19 मार्च : भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'कुख्यात दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता. 1993मध्ये राम जेठमलानी यांनी यासंदर्भातील प्रस्तावही शरद पवार यांच्याकडे दिला होता. पण पवारांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं', असा गंभीर प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी दाऊदबाबत खुलासा करावा, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली आहे.

''1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार होता. मात्र त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले शरद पवारांनी कोणताच निर्णय का घेतला नाही?,  याबाबतचा खुलासा पवारांनी करावा. दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे, पण ही संधी शरद पवारांमुळे हुकली'', असा थेट आरोपच आंबेडकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी ही माहिती जाणीवपूर्वक पुढे आणत आहे. कारण भविष्यात जे देशाचे संभाव्य नेते असू शकतील. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला पाहिजे. दाऊदबाबत भूतकाळातील ही माहिती उपलब्ध असताना नरेंद्र मोदी शरद पवार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवू शकतात?, असा प्रश्नदेखील आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांबाबत 'या' पक्षाच्या जाहीरनाम्यात धक्कादायक आश्वासन

Loading...

PM मोदींच्या 'मी चौकीदार'ला रोहित पवारांचा उपरोधिक टोला

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या करणार भाजप प्रवेश

VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...