चीनच्या दगाबाजीचे पडसाद राज्यात उमटले, भाजपाने चीनचा ध्वज जाळून वस्तूंचीही केली होळी

चीनच्या दगाबाजीचे पडसाद राज्यात उमटले, भाजपाने चीनचा ध्वज जाळून वस्तूंचीही केली होळी

भाजपने चीनचे राष्ट्र अध्यक्षाची प्रतिमा ,चीनच्या ध्वजाचं दहन करून चिनी वस्तूंची होळी केली आणि आपला निषेध व्यक्त केला.

  • Share this:

मालेगाव, 17 जून : भारत चीन सीमेवर लडाखमधल्या गलवान खोऱ्यात परवा रात्रीपासून सुरू असलेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या सैन्यानं सीमेवर दगाबाजी केल्यामुळे आपले 20 जवान शहीद झाले याचे पडसाद आज मालेगावात उमटले. भाजपने चीनचे राष्ट्र अध्यक्षाची प्रतिमा ,चीनच्या ध्वजाचं दहन करून चिनी वस्तूंची होळी केली आणि आपला निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चीन विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपचे शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी चीनविरोधात घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र असा निषेध व्यक्त केला. दरम्यान, गलवान खोऱ्यातली परिस्थिती नियंत्रणात आहे. सीमेवरचं सैन्य तणाव निवळण्याचा प्रयत्न करत आहे, हे एवढंच सांगताना चीनने संघर्षाला आम्ही जबाबदार नसल्याचं सांगत हात झटकले आहेत. मात्र त्याच वेळी चीनच्या बाजूचं किती नुकसान झालं, 43 सैनिक मृत्युमुखी पडले का याबाबत मात्र मौन बाळगलं आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्याने दोन देशांच्या लडाखजवळच्या सीमाभागात संघर्ष झाल्याचं निवेदन दिलं होतं. त्यात दोन्ही बाजूंकडचं नुकसान झाल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कराने यात धारातीर्थी पडलेल्या 20 जवानांची नावंसुद्धा जाहीर केली. मात्र चीनच्या बाजूने अद्यापही यावर अधिकृत काही माहिती जाहीर झालेली नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 43 चिनी सैनिकांच्या मृत्यूच्या बातमीबद्दल बोलायला नकार दिला. "सीमेवरचं सैन्य हे प्रकरण हाताळत आहे", एवढंच त्यांनी सांगितलं. भारताने 20 सैनिक शहीद झाल्याचं जाहीर केलं आहे, मग बीजिंग त्यांचं किती नुकसान झालं हे का लपवत आहे, असं वारंवार विचारल्यावर झाओ लिजियान म्हणाले, "मी आत्ता या विषयावर बोलणार नाही. चीन आणि भारताचे सैनिक एकत्रितरीत्या हे प्रकरण हाताळत आहे आणि माझ्याकडे आणखी सांगण्यासारखं काही नाही."

संपादन - रेणुका धायबर

First published: June 17, 2020, 5:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या