मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जड अंतकरणाने महाराष्ट्राच्या वीरपुत्रावर होणार अंत्यसंस्कार, कुटुंबावर शोककळा

जड अंतकरणाने महाराष्ट्राच्या वीरपुत्रावर होणार अंत्यसंस्कार, कुटुंबावर शोककळा

शहीद मोरे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असून संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे.

शहीद मोरे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असून संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे.

शहीद मोरे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असून संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे.

  मालेगाव, 27 जून : गलवान घाटीत नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचवताना गुरुवारी वीर मरण आलेले जवान सचिन मोरे यांच्यावर आज 10 वाजता त्यांच्या गावी मालेगावच्या साकोरी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव घेऊन सैन्यातील अधिकारी दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  शहीद मोरे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असून संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे. पंचक्रोशीतील नागरिक या वीर जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी गर्दी करीत आहेत. परिसरात शोककळा पसरलेली असून ज्या रथावरून अंत्ययात्रा काढली जाणार आहे त्याला फुलांनी सजवून ठेवण्यात आलेलं आहे. शहीद मोरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, 2 मुली आणि 6 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.

  या विरपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहे. शहीद सचिन मोरे हे एसपी- 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्ष अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी दोन मुली व सहा महिन्याचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. मोरे यांचं पार्थिव शुक्रवारी रात्री पुणे इथं तर शनिवारी साकुरी इथं आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  संपादन - रेणुका धायबर

  First published:
  top videos