मालेगाव, 25 जून : भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. अशात गलवान इथे कर्तव्य बजावत असतांना नदीत पडलेल्या दोन जवानांना वाचवताना मालेगावच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. मालेगाव तालुक्यातील साकुरी इथल्या सचिन विक्रम मोरे यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त येताच साकुरी गावासोबत मालेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
गलवान खोऱ्यात सीमा वाद थांबण्याच नाव घेत नाही आहे. चर्चेतून हा विवाद सोडवण्यात यावा यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असतानाच विश्वासघात करण्यात आला होता. शांततापूर्ण चर्चेसाठी चीन सैनिकांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांवर चीनच्या सैनिकांनी हल्ला केला होता. तब्बल तीन तास ही हिंसक झडप सुरू होती. चीनच्या सैनिकांनी पहिल्यांचा हल्ला करत दगडफेक केली आणि त्यानंतर काठीनं मारहाण करण्यास सुरुवाद केली आणि हा वाद पेटला.
हैदराबाद बलात्कारानंतर पुन्हा हादरला देश, मुलीने विरोध केला म्हणून जिवंत जाळलं
चीननं पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात मोठा धोका दिला. या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून पुन्हा धुमश्चक्री झाली. भारत- चीन सीमेवर झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. तर चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं होतं.
Covid-19 : गेल्या 24 तासांत कोरोना वाढला की कमी झाला? पाहा लेटेस्ट आकडेवारी
दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ संभाषण सुरू असताना हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि काठीने मारहाण करण्यात आली होती. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती. चीन सैनिकांनी केलेल्या हल्लाला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी आहेत तर काही जण बेपत्ता असल्याचंही सांगितलं जात होतं.
लॉकडाऊनमध्ये पार्किंगचा वाद हत्येपर्यंत पोहोचला, सपासप वार करून महिलेचा खून
संपादन - रेणुका धायबर