'सेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात', आमदाराचा खळबळजनक दावा

'सेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात', आमदाराचा खळबळजनक दावा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडे 170-175 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. पण आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी सेनेचे 25 आमदार सत्ता स्थापनेनंतर भाजपमध्ये जातील असं म्हटल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आज तरी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकार स्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या चर्चेत काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यांनी आतापर्यंत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका मांडली आहे. राऊत यांनी जे ठरलंय तेच झालं पाहिजे असं म्हणत आमच्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे आणि हा आकडा 175 पर्यंत जाऊ शकतो असा दावा केला होता. त्यानंतर आता भाजपला अपक्ष पाठिंबा दिलेल्या एका आमदाराने सेनेचे 20 ते 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हटलं आहे.

राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने काम केलं आहे. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. तसेच सत्ता स्थापन झाल्यानंतर सेनेचे 20 ते 25 आमदार भाजपमध्ये जातील असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असेल तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही.

संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट, सत्तास्थापनेसाठी देणार 'हा' प्रस्ताव

युतीचे सरकार स्थापन करण्याआदी शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासह आणि अन्य महत्त्वाची खाती मागितली आहेत. लोकसभा निवडणुकीआधी ठरलेल्या प्रमाणे सत्ते वाटप व्हावे, या मतावर शिवसेना ठाम आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले आहे की, मीच पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असेन. शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शिवसेनेने जर सरकार स्थापनेचा दावा केला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची देखील गरज असेल.

वाचा : सत्ता स्थापनेपासून ते अवकाळी पावसापर्यंत या आहेत 10 महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 4, 2019 01:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading