भाजपला आता 'ते' आमदारही देणार धक्का? सत्तेची समीकरणं बदलताच हालचाली

महाराष्ट्रात सत्तेची नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच सत्तेपासून दूर चाललेल्या भाजपला आणखी एक धक्का बसू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 09:55 PM IST

भाजपला आता 'ते' आमदारही देणार धक्का? सत्तेची समीकरणं बदलताच हालचाली

मुंबई, 10 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. अशातच आता भाजपने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवल्याने या नाट्यात ट्विस्ट निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सत्तेची नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्तेपासून दूर चाललेल्या भाजपला आणखी एक धक्का बसू शकतो.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून मोठा संघर्ष निर्माण झाला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मात्र सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे मग निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रित म्हणजे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरू केल्याची माहिती आहे.

सर्वसाधारणपणे अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतात. आता राज्यात सत्तेचं समीकरणच बदलत असल्याने आधी पाठिंबा दिलेले आमदारही भाजपला धक्का देत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याने आता अपक्ष आमदार भाजपची साथ सोडून इतर पक्षात जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे जाणार शरद पवारांच्या भेटीला? उलथापालथ होणार

Loading...

सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच आता उद्धव ठाकरे पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेला राज्यपालांचं निमंत्रण

सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दाखवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर प्रतिसाद देण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला आहे.

VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: NCP
First Published: Nov 10, 2019 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...