सिंधुदुर्गात काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठका

सिंधुदुर्गात काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठका

ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेकडून आलेले नेते हुसेन दलवाई , राजन भोसले , हुस्नबानो खलिपे , विश्वनाथ पाटिल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज बोलावली आहे. मात्र त्याच वेळी नारायण राणे यानी काँग्रेस जिल्हा कार्यकारणीची स्वतंत्र बैठक बोलावली आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग,08 सप्टेंबर: नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सगळीकडे चालू आहे. त्यातच त्यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्यालाही दांडी मारली. यातच आता सिंधुदुर्गातही त्यांनी काँग्रेसची एक वेगळी स्वतंत्र बैठक बोलावल्याने भर पडली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेकडून आलेले नेते हुसेन दलवाई , राजन भोसले , हुस्नबानो खलिपे , विश्वनाथ पाटिल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज बोलावली आहे. मात्र त्याच वेळी नारायण राणे यानी काँग्रेस जिल्हा कार्यकारणीची स्वतंत्र बैठक बोलावली आहे. दोन्ही बैठकांची वेळ जवळपास एकच असल्यामुळे सिंधुदुर्गातील काँग्रेस ही राणेंचीच काँग्रेस आहे हे दाखवण्यात येतंय.

या दोन्ही बैठकांपैकी कोणते कार्यकर्ते कुठल्या बैठकीला जातात याकडे सगक्यांच लक्ष लागलंय

First published: September 8, 2017, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading