मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर कॉंग्रेसकडून माजी सैनिकांचा अवमान, सत्कार न घेताच सैनिक घरी परतले!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर कॉंग्रेसकडून माजी सैनिकांचा अवमान, सत्कार न घेताच सैनिक घरी परतले!

कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत भाषणं सुरू होती. त्यामुळे तब्बल 3 तास झाले तरी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम काही सुरूच झाला नाही.

कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत भाषणं सुरू होती. त्यामुळे तब्बल 3 तास झाले तरी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम काही सुरूच झाला नाही.

कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत भाषणं सुरू होती. त्यामुळे तब्बल 3 तास झाले तरी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम काही सुरूच झाला नाही.

सोलापूर, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या ( Independence Day ) पुर्वसंध्येला सोलापूर (solapur) कॉंग्रेसकडून (congress) माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नीचा अवमान झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी माजी सैनिकांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण, अर्धवट नियोजनामुळे सत्कार न घेताच माजी सैनिक कार्यक्रमातून निघून गेले.

कॉंग्रेसतर्फे 'व्यर्थ न हो बलिदान'हा उपक्रम राबवला जात आहे. सोलापूरमध्ये कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी 75 व्या स्वातंत्रदिनानिमित्त 75 माजी सैनिक, वीरपत्नी तसंच वीरमातांचा सत्कार ठेवला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे सुद्धा उपस्थित होत्या.

पण, कार्यक्रमाला सुरुवात झाली, कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत भाषणंच सुरू होती. त्यामुळे तब्बल 3 तास झाले तरी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम काही सुरूच झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या माजी सैनिकांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता सत्कार न घेताच स्वगृही परतल्या. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्काराच्या नावाखाली 3 तास ताटकळत ठेवल्याचा माजी सैनिकांनी आरोप केला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव इथे 13 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

'काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून गेल्या ३ दिवसांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. माजी सैनिकांच्या सत्कारासाठी बोलावलं. त्यामुळे मी 75 जणांना सत्कारासाठी घेऊन आलो होते. कोरोनाचे नियम पाळून आम्ही सर्वजण कार्यक्रमाला हजर होते. पण, कार्यक्रम सुरू झाल्यापासून फक्त काँग्रेसच्या नेत्यांची भाषण, सत्कार सुरू होते. नगरसेवक, अध्यक्ष, आमदार, खासदारांचा सत्कार झाला. पण, आम्हाला ३ तास बसवून ठेवलं होतं. आम्हाला त्यांनी वेड्यात काढलं, आम्ही माजी सैनिक आहोत, जर सत्कार करायचा नव्हता तर कार्यक्रमाला बोलावले कशाला, असा संतप्त सवाल भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तलीखेडे यांनी उपस्थितीत केला.

'काश्मीरनंतर लाहोरच्या किल्ल्यावरही तिरंगा फडक राहो'; भाजप नेत्याचं Tweet चर्चेत

'मोदी सरकार हे लोकांची दिशाभूल करत आहे. जी लोकं सरकारच्या विरोधात जे बोलतात त्यांची ट्वीटर अकाऊंट बंद केली जात आहे. सरकार म्हणजे देश नाही. आम्ही देशप्रेमी आहोत. पण, सरकारविरोधात बोललो तर देशद्रोही ठरवलं जात आहे, त्यामुळे देश एकसंध ठेवण्यासाठी समोर आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. पण, त्यांनी झालेल्या गोंधळावर बोलण्याचं टाळलं.

First published:

Tags: Congress, Independence day